Lonavala : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वरसोली टोल नाक्यावरील टोल वसुली बंद

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भारत देश 21 दिवस लाॅकडाऊन करण्यात आल्याने वरसोली टोलनाक्यावरील टोल वसुली देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कोरोना आजाराचा पार्द्रुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 21 दिवसांचा बंद जाहिर केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नॅशनल हायवे आँर्थटीने देखील शासनाचा पुढिल आदेश होईपर्यंत देशभरातील सर्व टोलनाके बंद करण्याचा आदेश जारी केल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका तसेच द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका मध्यरात्री बारा वाजल्यापास वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. टोल कर्मचारी यांना सुट्टी देण्यात आली असून लाँकडाऊन संपेपर्यंत घरातून बाहेर ज येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण पोलीस ठाणे आणि चौक्यांवर जंतुनाशक फवारणी
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा परिसर व वरसोली टोलनाका येथिल पोलीस चौकीच्या परिसरात वेहेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. पार्थ पवार फाऊंडेशन कामशेतच्या वतीने वाहतुक पोलीसांना मास्क वाटप करण्यात आले.

पोलीसांनी जपले सामाजिक दायित्व
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने व हाॅटेल बंद ठेवण्यात आल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना सामजिक संस्था व ग्रामस्त यांच्याकडून जेवणाची पाकिटे, चहा, बिस्लरी वाटप केले जातात. अतिरिक्त प्रमाणात हे साहित्य येत असल्याने पोलीस कर्मचार्‍यांची भूख भागल्यानंतर पोलीस कर्मचारी शिल्लक राहिलेली जेवणाची पाकिटे व पाणी बस स्थानक, रेल्वे स्टेशनच्या परिसरात बसलेले गोरगरिब व भिकारी यांना देऊन त्यांची भुख भागवत सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन लोणावळा शहर व ग्रामीण पोलीसांनी केले आहे. वरसोली टोलनाक्यावर काही तरुणांना पोलीसांनी चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर बुधव‍ारी व्हायरल झाला होता. त्याची चौकशी केली असता ग्रामीण पोलीस म्हणाले, युवक बिनकामाचे फिरत होते, त्यांना समज देऊन घरी पाठवून दिले. मात्र, त्यांनी घरी न जाता वरसोली कचरा डेपोच्या मागू पुन्हा लोणावळ्यात जाण्याचा प्रयत्न केला. समज देऊन देखील ते ऐकत नसल्याने त्यांना चोप देण्यात आला. राज्यावर कोरोनाचा संकट आले आहे. सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू केलेली असल्याने नागरिकांनी घरात थांबणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.