Lonaval : विदेशी दारुच्या बाटल्यांमधील दारु चोरणाऱ्या दोन जणांना अटक 

एमपीसी न्यूज- कुणेगाव येथील डेला अँडव्हेंचर क्लबमधील बारमध्ये काम करताना महागड्या विदेशी दारुच्या बाटल्यांमधून दारु चोरुन त्यामध्ये देशी बनावटीची त्याच रंगाची दारु भरुन ठेवणार्‍या दोन जणांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना वडगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

याप्रकरणी कुणाल कमलेश नायर (वय 31, रा. विलेपार्ले मुंबई. सध्या राहणार तुंगार्ली लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्य‍ादीवरुन सुरेन हेमकुमार प्रधान (वय 30, रा. मूळचा सिक्कीम, सध्या राहणार नांगरगाव लोणावळा) व मनोजकुमार महेंद्रसिंग (वय 25, रा. मूळचा हरियाणा, सध्या राहणार नांगरगाव लोणावळा) यांना विदेशी मद्याच्या चार बाटल्यासह लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली.
  • प्रधान व महेंद्रसिंग हे बार मधील महागड्या विदेशी दारुच्या बाटल्यामधील दारु सील तोडून काढायचे व त्याजागी देशी बनावटीची त्याच रंगाची दारुची मिक्सिंग करुन पुन्हा सील करायचे. याप्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जे.जे.पाटणकर हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.