PimpleGurav : मराठवाडा जनविकास वर्धापनदिनानिमित्त पाणपोईचे उदघाटन

एमपीसी न्यूज –  मराठवाडा जनविकास संघाचा सातव्या वर्धापनदिनानिमित्त पाणपोईचे उदघाटन करण्यात आले तसेच नचिकेत येथील बालग्राम संस्थेस धान्यवाटप करण्यात आले. मराठवाडा जनविकास संघाच्या मुख्य कार्यालयात संघाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 

वर्धापनदिनानिमित्त चिंचवड येथील अंध व अपंग नचिकेत बालग्राम या संस्थेस धान्य देण्यात आले. यावेळी  शिवकीर्तनकार डॉ. गजानन व्हावळ, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष भैरुजी मंडले, समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, शंकर तांबे, नामदेव पवार, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले. वामन भरगंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.