Lonavala : सिंहगड महाविद्यालयात युवक महोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता सिंहगड महाविद्यालयांमध्ये युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

युवक महोत्सावात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमापैकी सात कलागुणांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. यामध्ये विनोद लेखनमध्ये प्रथम तर शास्त्रीय नृत्य, सामूहिक नृत्य, गायन, वादविवाद, प्रश्नमजुंशा, पोस्टर मेकिंग यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना प्राचार्य डाॅ. राजेश ओसवाल व प्रा. सतीश मेंडके यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.