Loni Kalbhor : प्रियकरानेच केला ‘त्या’ महिलेचा खून, पोलिसांनी अखेर लावला छडा

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून या महिलेचा खून करण्यात आला होता. या खुनाची उकल करण्यात अखेर लोणी काळभोर पोलिसांना यश आले. या महिलेचा खून तिच्या प्रियकरानेच चारित्र्याचा संशयावरून केल्याचे उघड झाले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अखेर अटक केली.

वैशाली लाडप्पा दूधवाले (रा. कोरेगाव भीमा, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी महेश पंडित चौगुले (वय 24) या आरोपीला अटक केली आहे. त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, थेऊर ग्रामपंचायतच्या हद्दीत एक अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत महिलेबाबत कोणतीही माहिती नसल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास करून या महिलेचा प्रियकर महेश चौगुले याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस ही खात्यात दाखवतात त्याने खून (Loni Kalbhor) केल्याची कबुली दिली.

Pune : पाण्याच्या टाकीत पडलेल्या गाईला फायर ब्रिगेडच्या जवानांनी दिले जीवदान

मयत महिला आणि महेश यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केल्याची कबुली त्यांनी. तळेगाव दाभाडे परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.