Prostitution case : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा, एकास अटक

एमपीसी न्यूज – पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांकडून (Prostitution case) वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) सायंकाळी चिंचवड येथे करण्यात आली.
दिनेश वासूमल करमचंदानी (वय 28, रा. विजयनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रॉकी नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी संगनमत करून दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी दळवीनगरकडून (Prostitution case) चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर कारवाई करून दिनेश याला अटक केली. दोन महिलांची सुटका केली. आरोपीकडून तीन हजार 540 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.