Pune Crime : पुणे महापालिकेतील पिटी शिक्षकाचे अनेक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळेत पिटीचे क्लास (Pune Crime) घेणाऱ्या एका कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकाने अनेक अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करून त्यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेत हा सर्व प्रकार घडला. संबंधित शिक्षकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद कयूम अन्सारी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या पिटी शिक्षकाचे नाव आहे. ही घटना 29 जून ते पाच जुलै या कालावधीत एका शाळेत घडली आहे. 29 वर्षाच्या नागरिकाने याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले पेठ परिसरातील एका महानगरपालिकेच्या शाळेत मोहम्मद अन्सारी हा पीटीचे क्लास घेत होता. शाळेतील 12 ते 16 वर्षाच्या मुलींना पिटी शिकवताना त्यांच्या मांडीवर, हातावर आणि खाल्ल्यावर वाईट हेतूने स्पर्श करत असे. तसेच मुलींसोबत अश्लील भाषा वापरून त्याने वेळोवेळी लैंगिक छळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. कुणाकडे तक्रार करायची तर करा मी कुणाला घाबरत नाही अशी धमकीही त्याने अनेकदा (Pune Crime) दिल्याचे उघड झाले आहे. खडक पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मस्के करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.