_MPC_DIR_MPU_III

Pune : कोयत्याचा धाक दाखवून केली तब्बल सव्वासात लाखांची लूट

एमपीसी न्यूज – दूचाकीवर बॅंकेत भरण्यासाठी पैसे घेऊन चाललेल्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील तब्बल 7 लाख 15 हजार कोयत्याचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.17) दूपारी चारच्या दरम्यान मुंढवा येथील हडपसर रेल्वे स्टेशनजवळ घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी मनोज केवरामनी (वय 39, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज हे त्यांच्या मित्रासोबत कोरेगाव पार्क येथील सेवाविकास बॅंकेत भरण्यासाठी तब्बल 7 लाख 15 हजार घेऊन दूचाकीवर निघाले होते परंतु त्यावेळी दोन अनोळखी इसम दूचाकीवर त्यांच्याजवळ आले आणि त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीच्या पाठीवरील सॅकमधील 7 लाख 15 हजार चोरी करून नेले. याप्रकरणी मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.