Pune News : लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट प्रशालाला मिळाला तीनही वयोगटात विजेतेपदाचा मान

एमपीसी न्यूज : लॉयला माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टाटा ऑटोकॉम्प लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट संघाने (Pune News) 12, 14 आणि 16 अशी तीनही वयोगटात विजेतेपदाचा मान मिळविला.

लॉयला प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत 12 वर्षांखालील गटात सेंट व्हिन्सेंटने लॉयला प्रशालेचा नियोजित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंर शूट-आऊटमध्ये 3-1 असा विजय मिळविला. नियोजित वेळेत आठव्या मिनिटाला सम्यक भंडारीने मिळवून दिलेली आघाडी सेंट व्हिन्सेंट संघाला दोनच मिनिटे टिकविण्यात यश आले. त्यानंतर पूर्ण सामना 1-1 अशाच बरोबरीवर संपुष्टात आला. शूट-आऊटमध्ये जोनाह अम्बाट, जेम्स रिबेलो, प्रणव मोटवानी यांनी व्हिन्सेंटसाठी गोल केले. लॉयलाकडून केवळ अनुराग पारसनीसलाच गोल नोंदविण्यात यश आले. व्हिन्सेंटकडून आर्यन लवळेची संधी हुकली, लॉयलाकडून यशवंत गायकवाड, आदिराज सिंग आणि झिऑन हॅरी अपयशी ठरले.

शॉन परेरा, अॅरॉन डीसूझा, जाडेन अरलॅंडने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट संघाने 16 वर्षांखालील लॉयला प्रशालेचाच 4-0 असा पराभव केला. अॅरॉनने दोन, तर शॉन आणि जाडेनने एकेक गोल केला.

Pune News : पुणे- मुंबई महामार्गावर ट्रकचा अपघात, अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

त्यापूर्वी, 14 वर्षांखालील गटात गोलशून्य अशा बरोबरीनंतर सेंट व्हिन्सेंटने टायब्रेकरमध्ये लॉयला प्रशालेचा 3-2 असा पराभव केला. एथन लोबो, देव कांबळे, शौनक धापटे यांनी व्हिन्सेंटसाठी अचूक लक्ष्य साधले. लॉयलाकडून प्रणव कुलकर्णी, दर्श रासट यांनाच गोल करण्यात यश आले. व्हिन्सेंटकडून शौर्य बधाडे लक्ष्य साधण्यात अपयशी ठरला. लॉयलाच्या आयुष चव्हाण, अरहान शेख आणि पार्थ शिंदे गोल करू शकले नाहीत.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टाटा ऑटोकॉम्पचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोएल, लॉयलाचे प्रिन्सिपॉल फादर रेव्हरंड अनिष, लॉयला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, लॉयला प्रशालेचे व्यवस्थापक फादर फ्रान्सिस यांच्या हस्ते पार पडला.

 

निकाल –

12 वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला 1 (3) (सम्यक भंडारी 8 वे मिनिट, जोनाह अम्बाट, जेम्स रिबेलो, प्रणव मोटवानी) वि.वि. लॉयला 1 (1) (आदिराज सिंग 10 वे मिनिट, अनुराग पारसनीस)

14 वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट – 0 (3) (एथान लोबो, देव कांबळे, शौनक धापटे) वि.वि. लॉयला प्रशाला 9 (2) (प्रणव कुलकर्णी, दर्शन रासट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.