Pune News : लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बाजी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये लय कत्थक संस्थेच्या आस्था कार्लेकर आणि सहकारी कत्थक (Pune News) नृत्यातील ताल आणि त्याची लय आणि त्या मागचे गणित नृत्यातून सादर केले तसेच कात्रज येथील हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थ्यांनी थोर गणितज्ञ श्रीनिवास  रामानुजन यांच्या वरील लघु नाटिका सादर केली.

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी व  गणिताशी  मैत्री व्हावी या साठी सातत्याने प्रयत्नशील असणार्‍या मॅप एपिक संस्थेच्या अनेक उपक्रमा पैकी “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आणि राज्य पातळीवरील 4 थ्या लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा याच कार्यक्रमात पार पडला. यास डॉ. विकास मठे, शास्त्रीय उपकरण विज्ञान विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त) (ए.आर.डी.ए), काशिनाथ देवधर आणि दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे 11,000 7000 आणि 5000 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देण्यात आली. बालगट ते इयत्ता दहावी आणि खुल्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये 1 ते 100 अंक उच्चार, 11 ते 20 पाढे आणि 21 ते 30 पाढे, पावकी आणि निमकी, पाऊणकी आणि सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे असे विभाग होते. या स्पर्धेस पुणे, मुंबई, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, जळगाव येथून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

Pune News : लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट प्रशालाला मिळाला तीनही वयोगटात विजेतेपदाचा मान

मॅप संस्थेच्या मंदार नामजोशी यांनी या वेळी अंकनाद तसेच इतर गणित विषयक उपक्रमांची माहिती दिली. देवधर यांनी शास्त्रज्ञ  उपग्रह आणि खगोलशास्त्रात गणिताचा वापर कसा करतात हे सोदाहरण स्पष्ट केले तर मठे यांनी भौतिक शास्त्र आणि गणिताचा संबंध  तसेच अपूर्णांक पाढयांचे महत्त्व सांगितले. (Pune News) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत अंकज्ञानाला खूप महत्व दिलें गेले आहे. सात्मीकरण स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांची गणितीय गुणवत्ता सुधारेल असे प्रतिपादन केसरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा जाधव यांनी केले. डॉ प्रमिला सुरेश लाहोटी,  मुग्धा लेले, अनिरुद्ध गाडगीळ, मॅप संस्थेचे पराग गाडगीळ, निर्मिती नामजोशी, डॉ अश्विनी दातार, वैशाली लोखंडे , रश्मी जोशी, ज्ञानेश कुटे, दीपक अष्टपुत्रे, पुरुषोत्तम बेलवलकर, श्रद्धा दांडेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.