Chinchwad News : चिंचवड येथील महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग (Chinchwad News) कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यावर लाच स्वीकारल्या प्रकरणी आज शुक्रवार 23 डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत 32 वर्षीय पुरुषाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी बाबुराव विठोबा हंकारे, वय 51 वर्ष, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वर्ग 1, महावितरण चाचणी विभाग कार्यालय, चिंचवड, पुणे या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7 अ अन्वये चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार पुरुष हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीचे सोलर पॅनलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्यासाठी लोकसेवक बाबुराव हंकारे यांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे येथे दाखल करण्यात आली आहे.

Pune News : लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बाजी

या तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक बाबुराव हंकारे यांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी 40,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी (Chinchwad News) अंती 30,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारली. याप्रकरणी हंकारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  पोलीस निरीक्षक भारत सामके तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.