Sports Day : गायत्री विद्यालयात वार्षिक क्रीडा दिन साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चऱ्होली बुद्रुक शाळेच्या वार्षिक क्रीडा (Sports Day) दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वाघेश्वर क्रीडा संकुल येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

या प्रसंगी संस्थेचे संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणात क्रीडा स्पर्धा आयोजित करीत क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत होत्या. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका कविता कडू पाटील यांची उपस्थिती मोलाची ठरली. यावेळी कविता कडू पाटील यांनी उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळामध्ये हिरीरीने सहभागी होत आपल्यातील क्रीडा कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

Chinchwad News : चिंचवड येथील महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई

आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पालकांसाठी आयोजित केलेल्या खेळांमध्येही उत्स्फूर्तपणे पालक सहभागी होत क्रीडा दिनाची शोभा वाढवली.(Sports Day) सर्व शिक्षकांनी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सांगता परिश्रम पूर्वक उत्साहात झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.