Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. (Mahalunge) ही घटना 11 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडली.

जयेश शंकर फलके (वय 30, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक शंकर फलके (वय 27, रा. पिंपळे गुरव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ जयेश हे पुणे-नाशिक महामार्गावरून कुरुळी येथून जात होते. सुझुकी शोरूमच्या पुढे आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

यात जयेश हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Asian games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 75 पदकं

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.