Maharashtra : साताऱ्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

एमपीसी न्यूज – सातारा जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या (Maharashtra ) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सोमवारी (दि. 16) रात्री 11.36 वाजता हे धक्के जाणवले आहेत. याबाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रविवारी रात्री दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर सोमवारी सातारा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. सातारा भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत पाच किलोमीटर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचे उघडकीस आले नाही. 3.3 रिश्टर स्केल तीव्रता ही अतिशय (Maharashtra ) कमी मानली जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.