Maharashtra Corona Update : राज्यात आज 57,640 नवे रुग्ण ; 57,006 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्याने वाढ झालेले रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास एकसारखी आहे. आज दिवसभरात राज्यात 57 हजार 640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 57 हजार 006 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48 लाख 80 हजार 542 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 41 लाख 64 हजार 098 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 41 हजार 596 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 920 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 72 हजार 662 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 85.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा अधिक आहे.

सध्या राज्यात 38 लाख 52 हजार 501 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 32 हजार 174 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 84 हजार 582 नमूने तपासण्यात आले आहेत.

राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी 18 लाख डोस खरेदीचे आदेश दिले आहेत. तसेच, 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.