Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 139 नवे रुग्ण तर 125 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.5) 139 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 125 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एका रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आतापर्यंत 319 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1652 आहे.

शहरी भागात 91 तर ग्रामीण भागात 48 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 90 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला . वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 14747 झाली आहे. तर दिवसभरात 125 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 8, तळेगाव दाभाडे ग्रामीण 6, साळुंब्रे 6, इंदोरी 4, चांदखेड 4, नाणे 3, बेबड ओहळ 2, कोळे चाफेसर 2, आंबळे, आंबी, भोयरे, दारुंब्रे, कांब्रे नामा, मोरवे, नायगाव, सुदुंबरे, शिवणे, शिरगाव, राजपुरी, फळणे व नवलाख उंब्रे प्रत्येकी 1 एकूण 48 रुग्ण सापडले.

12776 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत आतापर्यंत 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5025,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2820 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 823 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 8668 रुग्ण तर ग्रामीण भागात 6079 रुग्ण आढळून आले आहेत.

7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.63 टक्के आहे तर मृत्यू दर 2.16 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 539, लोणावळा नगरपरिषद मध्ये 289, वडगाव नगरपंचायत मध्ये 58 व ग्रामीण भागात 766 असे एकूण 1652 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.