Maharashtra Corona Update : आज 6,436  कोरोना रुग्णांची नोंद, 18,423 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी)  दिवसभरात 6,436 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 18,423 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 10 हजार 136 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 57 हजार 034 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.76 टक्के एवढा आहे.

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 06 हजार 059 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 098 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,3830 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 6,73,875 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.