Maharashtra Corona Update : राज्यात आज 16,835 रूग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांची वाढ कमी होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात राज्यात 16 हजार 835 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 11 लाखांच्या वर पोहोचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 79.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात राज्यात 14 हजार 348 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये राज्यात 16 हजार 835 जणांनी करोनावर मात केली असून आता राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 11 लाख 34 हजार 555 इतकी झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 14 लाख 30 हजार 861 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात 37 हजार 758 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 108 रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर 79.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत राज्यात 70 लाख 35 हजार 296 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 14 लाख 30 हजार 861 जणांना कोरोनाचं निदान झाल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.

राज्यात 22 लाख 3 हजार 966 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 28 हजार 414 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.