शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Maharashtra Corona Update : राज्यात आज 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 5 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 32 हजार 176 एवढी झाली आहे तर, 16 लाख 95 हजार 208 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या 88 हजार 537 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 47 हजार 357 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.52 टक्के एवढा आहे तर, 2.58 टक्के एवढा मृत्यूदर आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 89 हजार 496 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 32 हजार 496 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 47 हजार 791 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 073 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

spot_img
Latest news
Related news