Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 10,225 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 90.31 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात सोमवारी 10 हजार 225 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15.24 लाखांवर गेली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.21 टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात सोमवारी 4 हजार 009 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 लाख 87 हजार 784 झाली आहे.

राज्यात सध्या एकूण 1 लाख 18 हजार 777 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सोमवारी 104 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 90 लाख 65 हजार 168 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 87 हजार 784 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 780 जण होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, 12 हजार 195 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.