Maharashtra : तुम्ही वारसदार तर आम्ही कोण? स्मिता ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

एमपीसी न्यूज : दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Maharashtra) यांची सून स्मिता ठाकरे यांनी आता ‘वारसदार’ या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही वारसदार तर आम्ही कोण? असा टोला लगावला आहे.   

त्या म्हणाल्या, की एकनाथ शिंदे कितीतरी योजनांवर काम करतात. महिला आणि मुलांसाठी काम करा. हे सर्व काही सोपे काम नाही. एकनाथ शिंदे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. तेव्हापासून जेव्हा ते बाळासाहेबांचे सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले. आज त्यांनी एका छोट्याशा 12×12 खोलीतून वर्षा बंगल्यापर्यंतचा प्रवास केला. ही काही सोपी बाब नाही. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नुसते वारसदार म्हटल्याने चालत नाही. तुम्ही वारसदार असाल तर आम्ही कोण आहोत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला स्मिता ठाकरे यांनी आपला पाठिंबा दिला आहे. स्मिता ठाकरे यांचा विवाह जयदेव ठाकरे यांच्याशी झाला होता, परंतु आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना टोला लगावताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.

Pimpri News : धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीसांची ड्रंक ड्राईव्हची विशेष मोहिम

असा मुख्यमंत्री आम्हाला हवा होता, असे स्मिता ठाकरे म्हणाल्या. राष्ट्रीय (Maharashtra) महिला दिनानिमित्त स्मिता ठाकरे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.