Pune News : वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकाराच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी

एमपीसी न्यूज : मागील आठ वर्षापासून केंद्र सरकारमार्फत (Pune News) सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. तसेच, सात महिन्यापूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयबाहेर होळी करण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाई कमी होण्याची सुबुद्धी येऊ दे अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, सतत होणार्‍या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे महागाईमधून बाहेर काढता येईल. याकडे सरकारच लक्ष नाही.

Maharashtra : तुम्ही वारसदार तर आम्ही कोण? स्मिता ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

हे राज्यातील जनतेला माहिती (Pune News) असून जनता यांना चांगलाच धडा शिकविणार आहे. त्यामुळे आज आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला महामार्ग कमी करण्याची सुबुद्धी देवाने त्यांना द्यावी अशीच प्रार्थना आजच्या होळी निमित्ताने देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.