Pimpri News : धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीसांची ड्रंक ड्राईव्हची विशेष मोहिम

एमपीसी न्यूज – होळी सणानंतर दुसऱ्या दिवशी राज्यभरात धुलिवंदन साजरे केले जाते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मध्य प्राशन करतात त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीसांमार्फत (Pimpri News) ड्रंक अँन्ड ड्राईव्ह च्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम मंगळवारी (दि.7) राबविली जाणार आहे.

धुलीवंदनादिवशी मोठ्या संख्येने नागरीक मद्य प्राशन करुन वाहने वेगात व धोकादायकरित्या चालवुन अपघात करुन स्वतःचे तसेच इतरांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करत असल्याने सदर वाहनचालकांवर वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

Pimpri Chinchwad : आमदार अश्विनी जगताप यांची औंध जिल्हा रुग्णालयाला भेट; सुविधा देण्याचे दिले आदेश

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड वाहतुक शाखेमार्फत उद्या 7 मार्च रोजी मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे वाहनचालकांच्या विरोधात दिवसभर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्याला वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह खटले न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. (Pimpri News) तरी वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवून कार्यवाही टाळावी असे अवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.