Maharashtra Lockdown : राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज – राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी (दि.14) होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री अर्थ विभाग आणि इतर विभागाबरोबर बैठक घेणार असून, बुधवारी कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

कोविडचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत घेतली ई-बैठक. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सहभागी झाले होते. कडक निर्बंध लावण्यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.