Maharashtra : रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी समन्वयांनी काम करावे – नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज : निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे, रेल्वेमध्ये (Maharashtra) प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवास करणा-या प्रवाश्यांवर तत्काळ रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी, रेल्वेमध्ये प्रवास करताना अपघात अथवा छेडछाडीची घटना घडल्यास पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रेल्वेने योग्य ती कार्यवाही करावी. रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षतेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयांनी काम करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिल्या.

विधानभवन येथे रेल्वमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत आयोजित बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गो-हे बोलत होत्या. यावेळी गृह विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार सिंह, पोलीस महासंचालक (रेल्वे) डॉ.प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त(रेल्वे) रविंद्र शिसवे, मुंबई मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला, पोलीस उपायुक्त मध्य रेल्वे मनोज पाटील, पोलीस उपायुक्त पश्चिम रेल्वे संदीप भाजीभाकरे, यासह महिला दक्षता समितीच्या सदस्या रेणुका साळुंखे, अरुणा हळदणकर, लीला पाटोडे, आशा गायकवाड, प्रतिका वायंदडे यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी उपसभापती नीलम गो-हे म्हणाल्या की, अलीकडे रेल्वेमध्ये प्रवास करणा-या (Maharashtra) महिलांची छेडछाड करणे, गळयातील दागिने अथवा मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत. कोणतीही महिला रात्री अथवा पहाटे रेल्वेमधून प्रवास करताना तिला अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयाने काम करावे.

निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे, रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे याबाबत गृह विभागाने तातडीने कार्यवाही करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे देखील रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षेकरिता लागाणा-या सुविधांबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maval : जेवणाचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकास मारहाण

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महिला प्रवासी डब्यात सुरक्षिकरिता असलेला स्टाफ त्यांच्या नियोजित कामाच्या वेळी हजर आहेत का? महिलांच्या तक्रारी येतात त्या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर लगेच कार्यवाही करणे. महिलांच्या प्रत्येक डब्यात तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही बसविणे, रेल्वे डब्यामध्ये बेकायदेशीररित्या प्रवास करणा-या प्रवाश्यांवर कडक कारवाई करणे, महिलांच्या प्रवासी (Maharashtra) डब्यात टॉक बॅक सिस्टीम बसविणे यावर काम होणे गरजेचे आहे.

महिला दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व फोन नंबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दर्शनी भागात लावण्यात यावे. अशा सूचना देखील यावेळी त्यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.