Maval : जेवणाचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकास मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर (Maval) त्याचे हॉटेल मालकाने पैसे मागितले. त्यावरून सात जणांच्या टोळक्याने हॉटेल मधील आचारी, हॉटेल मालक आणि त्यांच्या पुतण्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथील हॉटेल कॉलेज कट्टा येथे घडली.

शांताराम कुंडलिक शिंदे (वय 52, रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार दत्तात्रय घोजगे (वय 23, रा. आंबी, ता. मावळ) आणि त्याचे पाच ते सहा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्यांची गरज – माऊली दाभाडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आरोपी जेवण करण्यासाठी आले. त्यांनी जेवण केल्यानंतर फिर्यादींनी आरोपींकडे बिलाची मागणी केली. त्यावरून आरोपींनी हॉटेल मधील आचा-यास शिवीगाळ करून मारहाण केली.

तेव्हा फिर्यादी यांचा पुतण्या सोमनाथ शिंदे हे आरोपींना समजावून (Maval) सांगण्यासाठी आले. आरोपींनी सोमनाथ शिंदे यांनाही मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे काम करणारे गवंडी अशोक ओव्हाळ आणि आदित्य शिंदे यांनाही आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.