Talegaon Dabhade : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्यांची गरज – माऊली दाभाडे

एमपीसी न्यूज – सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांचे (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे येथे स्वागत करण्यात आले. तसेच सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी म्हटले की, सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी निस्वार्थपणे काम करणा-या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.”

Kalewadi : खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; माथाडी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

मावळ तालुक्यातील शेती विकास सोसायट्या आणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित सहाय्यक निबंधक  सर्जेराव कांदळकर यांचे स्वागत समारंभ आणी सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांचे निरोप समारंभात श्री दाभाडे हे बोलत होते.

या समारंभास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विभागीय अधिकारी गुलाब खांदवे,कैलास तारु,नीरज पवार,मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपतराव भानुसघरे, सचिव संजय ढोरे,धर्मा ठोंबरे,सुरेश कालेकर, धनंजय विधाटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दाभाडे म्हणाले की सहायक निबंधक विठ्ठल (Talegaon Dabhade) सुर्यवंशी यांनी मावळ तालुक्यातील  सहकार  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असुन आता नव्याने सहायक निबंधक म्हणून  रुजू  होत असलेले कांदळकर  यांचा शेती विकास सोसायट्या  बाबतचा  गाढा अभ्यास असल्याने  विकास सोसायट्यांची विशेष प्रगती  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपतराव भानुसघरे यांनी केले आहे. यानंतर बँक अधिकारी आणी  सहकारी सोसायट्याचे सचिव यांची आढावा बैठक संपन्न झाली.

Kalewadi : खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण; माथाडी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.