Maharashtra : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Maharashtra) हे शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Uddhav Thackeray : लोकशाही संपून बेबंदशाहीला सुरुवात – उद्धव ठाकरे

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनीही बैस यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.