Maharashtra News : पाकिस्तानला फुकट लस, मग महाराष्ट्राला 400 रुपयाने का ? : नाना पटोले

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारला करोना लस 150 रुपयांना मिळते, मग राज्य सरकारला तीच लस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराने का दिली जाते?, दुश्मन राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला करोनाची लस फुकट दिली जाते, मग राज्याला 400  रुपयाने का ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रात सध्या जागतिक महामारीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्यातच अपुरा ऑक्सिजनचा साठा , रेमेडीसीवरचा तुटवडा आणि बेड्सची कमी संख्या यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. दरम्यान या काळात रेमेडीसीवरच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक, मग ते केंद्रातले असो की राज्यातले एकमेकांवर सडकून टीका, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर आणि राज्यातल्या विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पटोले म्हणाले, सिरम कंपनीकडून लसीच्या किंमतीत होत असलेल्या भेदभाव निषेधार्ह आहे. जर लॉकडाऊन नसतं तर आम्ही या विरोधात आंदोलन केलं असतं. देशाच्या पंतप्रधानांनी कोविडबाबतचे व्यवस्थित नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आपला देश अधोगतीला लागला आहे. केंद्राने कोरोना प्रतिबंधक लस जगातल्या इतर काही देशांसारखी मोफत द्यावी, अशी मागणी पटोले यां

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.