Pune: महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता मेळाव्याकडे आदित्य ठाकरे यांनी फिरवली पाठ

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर (Pune)कार्यकर्ता मेळावा आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंध पुणे शहरात (Pune)तशा प्रकारची फ्लेक्सबाजीही करण्यात आली. मात्र, ऐनवेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

Pune: जेव्हा जेव्हा पुण्यातील खासदार आमचा निवडून येतो, तेव्हा तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते – नाना पटोले

शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच मिळाले नाही, केवळ 10 वर्षातच सर्व काही मिळाले, असे वातावरण निर्माण करण्याचे काम काही मंडळी करीत आहे. हुकूमशाही विरोधात लोकशाहीची लढाई आहे. कसबा मतदारसंघात सामान्य कार्यकर्त्यांनी चमत्कार करून दाखविला.
हो आम्ही करू शकतो, हे सिद्ध करून दाखविले, केवळ त्यांना ताकद देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात सुद्धा असे घडू शकतो. संसद रत्न मिळाल्यावर कौतुक करणारे आता काम होत नसल्याचे सांगत आहेत. या चारही मतदारसंघात उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. खांद्याला खांदा लावून काम करायला लागले आहात. रात्र वैऱ्याची असेल तरी विजय आपलाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.