Maharashtra News : राज्यात सात अपिलीय न्यायाधिकरण होणार स्थापन

एमपीसी न्यूज – वस्तू व सेवाकर परिषदेची 50 वी बैठक नुकतीच पार (Maharashtra News)पडली. त्यामध्ये महाराष्ट्रात सात अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.

वित्त मंत्रालयाच्यावतीने वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली.

Pune : वीजबिलांपोटी दरमहा 6 हजाराहून अधिक ग्राहकांचे ‘चेक बाऊंस’

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते.

या बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले.

बैठकीनंतर मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले, वस्तू व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस्तू व सेवाकराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात सात अपिलीय न्यायाधिकरण असावे, अशी राज्याची मागणी होती.

या बैठकीत ही मागणी मंजुरी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत (हॉर्स रेसिंग), कॅसीनो या बाबींवर आता 28 टक्के कर आकारण्यात येणार आहे. कायद्यामध्ये ऑनलाईन हा शब्द नसल्याने यासंदर्भात काही खटले न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

आता मात्र कायद्यात अतिशय स्पष्टता आणण्यात आल्यामुळे ऑनलाईन गेमिंगचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या महसुलात निश्चितच भर पडेल, असेही मंत्री मुनगंटीवार (Maharashtra News) यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.