Maharashtra : आक्षेपार्ह व्हिडीओ मीडियावर येणे हा बीजेपीच्या अंतर्गत कचराकोंडीचा परिणाम- मुकुंद किर्दत

नैतिकतेला सोडचिठ्ठी दिलेल्या भाजपचे सर्व मुखवटे गळून पडत आहेत : मुकुंद किर्दत

एमपीसी न्यूज – गटारी अमावस्येच्या दिवशी बीजेपीच्या किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप(Maharashtra) प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे. त्या संदर्भात भाजपच्या किरीट सोमय्यांनी या व्हिडिओच्या सत्यतेची आणि एकूण प्रकरणाची चौकशी करावी अशी स्वतःच मागणी केली आहे ही चांगलीच गोष्ट आहे.मात्र त्या निमित्ताने काही भ्रष्ट नेते जुना हिशोब पूर्ण करत आहेत का अशी शंका निर्माण होते आहे, असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे  मुकुंद किर्दत यांनी केले आहे.

Pavana Dam update :  पावसाचा जोर कायम; धरणाचा साठा 40 टक्यांवर,चोवीस तासात 93 मिली मीटर पाऊस

किर्दत म्हणाले, बीजेपी हे मोठे वॉशिंग मशीन झाले असून भ्रष्टाचारी व्यक्तींची चौकशी लावणे, ईडी आणि इतर तपासयंत्रणांच्या साह्याने धमकावणे आणि त्यांना नंतर पक्षात घेणे, पवित्र करणे ही मोहीम भाजपा देशभर काही वर्षे राबवित आहे.

या सगळ्यामुळे बीजेपीच्या अंतर्गतच एकमेकांना भ्रष्टाचारी ठरवणारे नेते सत्तेपोटी एकत्र राहत आहे. परंतु या सर्व काळात बीजेपी ने नैतिकता आणि पार्टी विथ डिफरन्स या स्वतःच्या वैशिष्ट्याला पूर्णपणे सोडचिठ्ठी दिलेली आहे.

पाटबंधारे , साखर कारखाने असो किंवा इतर मनी लॉन्ड्रीग किंवा बँक प्रकरण, अश्या या प्रकरणांशी संबंधित अनेक जुने राष्ट्रवादी, शिवसेने चे नेते आता भाजपमध्ये आहेत.

त्यामुळे भाजपमध्ये या अंतर्गत धुसफूस आणि कचराकोंडीचा परिणाम म्हणूनही व्हिडिओ ऐन अधिवेशनाचा काळामध्ये समोर आणला गेला आहे का अशी शंका आहे.

या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणांमध्ये कुणाचे शोषण होत असल्यास त्या व्यक्तीस न्याय मिळालाच पाहिजे आणि शोषणकर्त्याला शिक्षा व्हायला पाहिजे.

त्याच वेळेस राजकारणामध्ये सत्तेच्या साहाय्याने भ्रष्टाचार हा फक्त पैशाच्या रूपामध्ये नसतो तर नैतिक पातळीवर सुद्धा भ्रष्टाचार, अधःपतन होत असते आणि हे सर्व सामावून घेणारा मोठा पक्ष म्हणजे भाजप ही बाब या निमित्ताने अधोरेखित होते (Maharashtra) आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.