uddhav thackeray : …. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला : उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया

 एमपीसी न्यूज : “गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.” असं उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवात साधताना उद्धव ठाकरे यांनी घटनापीठाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. 

जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला ही चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल करतानाच  मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी ही लढत नाहीये. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा  

उद्धव ठाकरे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे. (uddhav thackeray) राज्यपालांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरणीय होती, यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्त्वात ठेवावी की नाही हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवं. पण आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळीच शिवसेना म्हणजे माझी शिवसेना यांच्याकडेच राहिल. आता अध्यक्षांनी यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करु.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.