Maharashtra Political Crisis : धमक्यांना भीक घालत नाही – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील असे म्हंटले होते. शिवसेनेच्या (Maharashtra Political Crisis)  धमक्यांना भीक घालत नाही – एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याविरोधात आहे, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्टिटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

 

Today Horoscope 24 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

 

कोणाला घाबरविण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो.घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे व्हिप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.यासंदर्भात सर्वोच्च नायालयाचे असंख्य निकाल आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला घाबरवू (Maharashtra Political Crisis)  धमक्यांना भीक घालत नाही . कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत, असंही ते म्हणाले.

 

 

आम्ही कायदा जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्याबळ नसताना अवैध गट तयार केला म्हणून आम्हीच तुमच्यावर कारवाईची मागणी करतो, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.