Pune : भक्तिमय वातावरणात वनाझ परिवारातील महाशिवरात्र महोत्सव

एमपीसी न्यूज – कोथरूडमधील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या वनाझ परिवार सोसायटीतील शिव मंदिरांमध्ये १९८० सालापासून महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी महाशिवरात्र महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

सोसायटीतील सदस्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे, विकास जाधव, दीपक कुल यांनी पुढाकार घेऊन परिवारातील असंख्य तरुणांसह वनाझ परिवार शिव मंदिर समिती, वनाझ परिवार सोसायटीतील कार्यकारणी, बालगोपाळांपासून आबालवृद्ध तसेच महिला भगिनींच्या सहकार्याने या महोत्सवास व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.

यंदाच्या वर्षी वनाझ परिवाराला संलग्न असलेल्या इंद्रधनू व स्टेट बँक नगर या सोसायट्यांनी देखील या महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून दुग्ध अभिषेक रुद्रमहायागाने सुरुवात झाली. ९ वा वनाज परिवार भजनी मंडळाकडून पालखी काढण्यात आली. यामध्ये परिवारातील महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारची महाआरती पद्मश्री पुरस्कार प्राप्त तबलावादक विजय घाटे व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते करण्यात आली. तर सायंकाळची महाआरती पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आली. रात्रीच्या बारा वाजता महादेवाला उसाच्या रसाचा अभिषेक करण्यात आला व भस्म आरती झाली.

यंदाच्या वर्षी आकर्षक विद्युत रोषणाई बरोबर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील व गाभाऱ्यातील फुलांच्या मनमोहक सजावटीमुळे मंदिर आणि आजूबाजूचा परिसरामध्ये प्रसन्नमय वातावरण निर्माण झाले होते. सुमारे दहा हजार भाविक भक्तांनी महादेवाचं दर्शन घेताना वनाज परिवारातील वातावरण भक्तिमय झाले होते.

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केलं होतं. वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनींनी तथा तरुणांनी या महाप्रसादाच व्यवस्थापन केलं. कोथरूडमध्ये सुमारे तीन हजार नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या महाशिवरात्र महोत्सवांमध्ये पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेना गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार, मनसे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, सभागृह नेते धीरज घाटे, कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, उद्योजक प्रवीण शेठ बढेकर, स्थानिक नगरसेवक हर्षली दिनेश माथवड, वासंती नवनाथ जाधव, अल्पना गणेश वरपे, श्रद्धा प्रभुणे-पाठक, राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, रोहिदास अप्पा सुतार, मा.नगरसेवक राजाभाऊ गोरडे, कोथरूड बस डेपो मॅनेजर चंद्रकांत वरपे, उद्योजक वेंकटेश चौलवार, धनंजय कुंबरे, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, बाळा टेमकर, रुपेश भोसले आदी सामाजिक शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर मंडळी बहुसंख्येने सामील झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.