Pune : मेट्रोला पुण्यात प्रवासी मिळणार का?

एमपीसी न्यूज – मेट्रोचा प्रवास म्हणजे जीना चढून स्टेशन चढणे, मग मेट्रोत बसणे, परत खाली उतरणे, मग आपल्या इच्छित स्थळी ‘पीएमपीएमएल’, रिक्षा किंवा दुचाकीवरून जाणे हा सर्व खटाटोप पुणेकर करणार का? असा प्रश्न आहे. 11 हजार 500 कोटी रुपये किमतीचा मेट्रो प्रोजेक्ट सध्या शहरात सुरू आहे.

दुचाकी चालविण्यात पुणेकरांचा जगात प्रथम क्रमांक लागत असल्याचे बोलले जाते. पुणेकरांचा गारेगार प्रवास व्हावा म्हणून मेट्रो ही गरजेची असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट आशा दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या दोन्ही मार्गामुळे पिंपरी आणि पौड रोड, कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच मेट्रो संदर्भात पुण्यात मोठे विधान केले आहे. पुढील 10 वर्षांत मेट्रो हा ‘पांढरा हत्ती’ ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा खर्च राज्य शासनाला उचलावा लागणार असल्याचे भाकीत त्यांनी व्यक्त केले. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे चे उदाहरणही त्यासाठी देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.