Mahindra : महिंद्राने केली पहिल्या सी-सेगमेंट इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400 च्या किंमतीची घोषणा

एमपीसी न्यूज : भारतात एसयूव्ही (Mahindra) सेगमेंटची प्रवर्तक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने 2023 मध्ये जागतिक इव्ही दिनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400च्या किंमतीची घोषणा केली. इलेक्ट्रिक क्रांतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार खरेदीदारांसाठी एक्सयूव्ही 400 डिझाईन व इंजिनीयर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिफिकेशनच्या मार्गावर सुरु असलेल्या महिंद्राच्या वाटचालीला वेगवान बनवण्याची क्षमता असलेल्या या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 15.99 लाखांपासून पुढे आहे.

ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400 च्या बुकिंगची सुरुवात 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. एक्सयूव्ही 400 ईएलच्या डिलिव्हरीज मार्च 2023 मध्ये सुरु होतील, तर दिवाळीत सणासुदीच्या काळात एक्सयूव्ही 400 ईसीच्या डिलिव्हरीज सुरु होतील.

आपल्या जवळच्या डीलरशिपमध्ये जाऊन या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या शानदार टेस्ट ड्राइव्हचा आनंद घेता येईल. लॉन्चच्या पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, सुरत, जयपूर, मुंबई एमएमआर, नाशिक, वेर्णा (गोवा), पुणे, नागपूर, बंगलोर, चेन्नई, त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद, चंदीगड, दिल्ली एनसीटी, कोलकाता, डेहराडून, कोईम्बतूर, औरंगाबाद, भुवनेश्वर, कोल्हापूर, म्हैसूर, मंगलोर , वडोदरा, पाटणा, कालिकत, रायपूर, लुधियाना, उदयपूर, जम्मू, गुवाहाटी, लखनौ, आग्रा, इंदूर अशा एकूण 34 शहरांचा समावेश आहे.

या गाडीचे एक्सयूव्ही 400 ईसी आणि एक्सयूव्ही 400 ईएल हे दोन प्रकार उपलब्ध असून प्रत्येक प्रकारच्या गाडीच्या पहिल्या 5000 बुकिंग्ससाठी शुभारंभाची किंमत लागू करण्यात आली आहे. लॉन्च केल्यापासून पहिल्या वर्षभरात एक्सयूव्ही 400 ची 200000 युनिट्स ग्राहकांना सुपूर्द करण्याचे लक्ष्य महिंद्राने आखले आहे.

Today’s Horoscope 20 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ऑटोमोटिव्ह-ग्रेड सेमीकंडक्टर्सच्या मागणी व पुरवठ्यातील संरचनात्मक तफावत आणि बॅटरी पॅक्सची उपलब्धता ही सर्व आव्हाने विचारात घेऊन हे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. अतिशय तेजस्वी असा कॉपर ट्वीन पीक लोगो असलेली एक्सयूव्ही 400 ही महिंद्राची पहिली इव्ही आहे.

या लोगोमुळे रस्त्यावर या गाडीची शान आणि प्रभाव (Mahindra) अतिशय अनोखा असणार आहे. या गाडीचे दोन प्रकार उपलब्ध आहेत एक म्हणजे एक्सयूव्ही 400  ईएलमध्ये 39.4 केडब्ल्यूएच बॅटरी आणि एक्सयूव्ही 400 ईसीमध्ये 34.5 केडब्ल्यूएच बॅटरी आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये रंगांचे पाच आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत – आर्क्टिक ब्ल्यू, एव्हरेस्ट व्हाईट, गॅलॅक्सी ग्रे, नापोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्ल्यू सोबत सॅटिन कॉपरच्या ड्युएल टोनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीसोबत 3 वर्षे/अमर्याद किमी इतकी स्टॅंडर्ड वॉरंटी देण्यात येत आहे. शिवाय बॅटरी व मोटरसाठी 8 वर्षे किंवा 1, 60, 000 किमी (यापैकी जे आधी संपेल तोपर्यंतची) वॉरंटी देण्यात येत आहे.

 

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे प्रेसिडेंट वीजय नाक्रा म्हणाले, “एक्सयूव्ही 400 चे लॉन्च हा महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही वाटचालीतील एक संस्मरणीय टप्पा आहे. उत्तम कामगिरी, डिझाईन, जागा, तंत्रज्ञान आणि अतिशय आकर्षक किंमत यांचा सुयोग्य मिलाप म्हणजे एक्सयूव्ही 400. पर्यावरणस्नेही, शाश्वत भवितव्य निर्माण करण्यात योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी आम्ही हा ब्रँड विकसित केला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, आमची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतातील अधिकाधिक ग्राहकांना (Mahindra) इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी प्रेरित करेल. भारतात पर्यावरणस्नेही मोबिलिटी सुविधा विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला यामुळे अधिक बळ मिळाले आहे.”

Pune : कलापिनी महिला मंच आणि बाल भवनचा वैशिष्ट्यपूर्ण संक्रांत उत्सव संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.