Pune : कलापिनी महिला मंच आणि बाल भवनचा वैशिष्ट्यपूर्ण संक्रांत उत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : संक्रांत म्हणजे (Pune) उत्साहाचा, आनंदाचा, छान छान वाणं देऊन एकमेकींशी संवाद साधण्याचा सण. महिला आतुरतेने ह्या सणाची वाट पाहतात. असा हा उत्साहाचा समारंभ कलापिनीमध्ये बालभवन आणि महिला मंच यांनी मिळून अतिशय उत्साहात साजरा केला.

या कार्यक्रमाचे सगळ्यात मोठे आकर्षण होते संक्रांतीची एक सुंदर रांगोळी….ताज्या मटारच्या शेंगा, वालाच्या शेंगा, केशरी गाजरे, पांढरा शुभ्र मुळा, अशा भाज्या वापरून आणि ओटीचे खण, बांगड्या, तांदूळ, सुगडी इत्यादी सामान वापरून सुंदर असा गालीचाच जणू अंथरला होता. त्यामध्ये सूर्य होता, समई होती, सुंदर आधी महिरप होती. हे सगळे साकारले होते सुप्रिया खानोलकर, दीपाली जोशी, राखी भालेराव, मधुवंती रानडे, छाया हिंगमिरे ह्यांनी.

नुसते हळदीकुंकू न करता काहीतरी वेगळं करावं, म्हणून सर्व महिलांचे छोटे छोटे खेळ घेण्यात आले. तसेच त्यांना उखाणेही घ्यावयास सांगण्यात आले. सर्व महिलांनी आनंदाने व उत्साहाने उखाणे घेतले आणि खेळही खेळले. काही महिलांनी आपणहून पुढाकार घेऊन काही कला सादर केल्या. त्यायोगे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

अंजली सहस्रबुद्धे ह्यांनी दिप प्रज्वलन केले (Pune) आणि स्वागत करताना सांगितले, की कलापिनीमध्ये आपले भारतीय सण आणि उत्सव नेहमीच साजरे केले जातात. त्यामुळे मुलांना त्याची ओळख होते आणि माहिती पण मिळते. मधुवंती रानडे, अनघा बुरसे, रश्मी पांढरे, मीरा कोन्नुर, वृषाली आपटे उपस्थित होत्या.

महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बालचमुही अतिशय उत्साहाने आला होता. समारंभाचे सूत्रसंचालन लीना परगी ह्यांनी केले. हळदीकुंकू, अत्तर, तिळगुळ आणि छोटे नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले. बाल भवन प्रशिक्षिका आणि सर्व कार्यकर्त्या महिलांनी अतिशय मेहनतीने हा समारंभ यशस्वी केला.

Narendra Modi : जगभरात अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट असताना भारतात करोडो लोकांना वाटले मोफत रेशन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.