Today’s Horoscope 20 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 January 2023
वार – शुक्रवार.
20.01.2023
शुभाशुभ विचार – क्षयदिन
आज विशेष- शिवरात्री.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- मूळ 12.40 पर्यंत नंतर पूर्वाशाढा
चंद्र राशी – धनु.
—————————————-
मेष ( शुभ रंग- मरून )
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखल. दैवाची उत्तम साथ राहील.

वृषभ (शुभ रंग- निळा )
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ राहील. कुटुंबास आज तुम्ही पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन ( शुभ रंग- मोरपिशी )
धंद्यातील येणी वसूल होतील.गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांची ही मने जिंकाल. जुनी दुखणी असतील तर अंगावर काढू नका. आज विश्रांती ही गरजेची आहे.

कर्क (शुभ रंग –  जांभळा)
व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याच्या काही तक्रारी ही त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग आहे.

सिंह (शुभ रंग – पिस्ता)
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना आज तुम्हाला नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.

कन्या ( शुभ रंग – जांभळा)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ सभाचार येणार आहेत.

तूळ ( शुभ रंग – पांढरा)
आज आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करू शकाल. आज क्षुल्लक कारणाने शेजारी रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा कारण त्याने नाती दुरावतील.

वृश्चिक (शुभ रंग – गुलाबी ) – Today’s Horoscope 20 January 2023
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारीच नसेल. उतावीळ पणाने घेतलेले काही निर्णय हमखास चुकतील. आज तुम्ही हातचे सोडून पळत्याच्या मागे धावाल.

धनु (शुभ रंग – गुलाबी)
आज पूर्वी हरवलेली एखादी वस्तू अनपेक्षित पणे सापडेल. तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल घरात थोरा मोठ्यांच्या हो ला हो करा परंतु वाद वाढवू नका.

मकर (शुभ रंग – क्रीम )
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वणवण करावी लागेल. अनावश्यक खर्चाचे प्रमाणही वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे संभवतात. हातचे सोडून मृगजळा मागे धावणार आहात.

कुंभ (शुभ रंग – केशरी )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होणार आहेत.

मीन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
उद्योग धंद्यातील काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे हिताचे राहील. व्यस्त दिवस.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.