Mansoon : अखेर पाऊस परतला माघारी; थंडीचे करा स्वागत!

एमपीसी न्यूज : दिवाळीचा पहिला दिवा पाहून पाऊस (Mansoon) माघारी जातो असे आपल्या घरातील जुनी माणसे नेहमी सांगतात. यंदाही पावसाने जणू काही पहिला दिवा पाहूनच पुण्यासह देशभरातून माघार घेतली आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य मॉन्सून परतल्याचे आयएमडीने सांगितले आहे.

या वर्षीच्या पावसाने विशेष करून परतीच्या पावसाने राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याभरात पाऊस कधी थांबेल? कधी माघारी फिरेल याची सर्वजण वाट पाहत होते. परंतु, आता सर्वांनाच दिलासा देणारी बातमी समोर आली. आयएमडीने सांगितल्याप्रमाणे पाऊस माघारी फिरला (Mansoon) असून आता एप्रिल 2023 नंतरच त्याचे अपडेट आपल्याला पाहायला मिळणार.

Pimple gurav news: पिंपळेगुरवमध्ये जल्लोषात रंगली दिवाळी पहाट; नागरिकांची प्रचंड गर्दी, तरूणाई आणि महिलांनी धरला ठेका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.