Patrakar Sangha : पत्रकार संघ पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी भिमराव तुरुकमारे यांची निवड

एमपीसी न्यूज : चौथा स्तंभ (Patrakar Sangha) संपादक, पत्रकार व सोशल मिडिया संघाच्या पत्रकार विंगच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी भिमराव तुरुकमारे, तर सोशल मिडिया शहरध्यक्ष पदी कमलेश जैन यांची निवड करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय गोरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश ब्रम्हा, चौथा स्तंभ संपादक, पत्रकार व सोशल मिडिया संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलक, संस्थापक सचिव दिलीप देहाडे, जिल्हा निरिक्षक भिमराव तुरुकमारे, शाम उनवणे, दिपक श्रीवास्तव यांच्या उपस्थित पत्र देण्यात आले.

यावेळी रमेश ब्रम्हा यांनी संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या (Patrakar Sangha) न्याय हक्कासाठी व पत्रकारांचा सन्मान करणारी हि संघटना आहे. त्यामुळे शहरातील दैनिक, साप्ताहिक, पोर्टल, मासिक सर्व मिडियाच्या स्तरावर काम करणारी संघटना असल्याने शहराला एक नवी कलाटणी देणारी ताकद आहे.

Mansoon : अखेर पाऊस परतला माघारी; थंडीचे करा स्वागत!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.