Chikhali : आम्हीच इथले भाई म्हणत तिघांनी केली एकाला मारहाण

एमपीसी न्यूज : तीन जणांच्या (Chikhali) टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ व लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोयत्याने जखमी करून दहशत माजवल्याची घटना काल (22 ऑक्टोबर) करवीर बस स्टॉपजवळ रुपीनगर चिखली येथे घडली आहे.
याबाबत सचिन मोरे (वय 33 वर्षे, रा. अष्टविनायक चौक, विठ्ठल मंदिराच्या शेजारी माऊली हॉस्पिटल सोसायटी, मोरे वस्ती, चिखली, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शुभम कदम (वय 21 वर्षे, रा. माऊली हौसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे, पुणे) व त्याचे दोन मित्र ज्यांचे पूर्ण नाव पत्ता माहित नाही असे एकूण तीन आरोपींच्या विरोधात भादवि कलम 307, 323, 504, 507, 34, 427, आर्म ॲक्ट कलम 4 (25) क्रिमिनल अमेटमेंट कलम 3, 7 अन्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या दुकानांमध्ये असताना आरोपी शुभम कदम व त्यांच्या दोन मित्रांनी तळवडे रोडवरील करवीर बस स्टॉप येथे व जवळच असलेल्या फिर्यादी यांच्या दुकानाच्या समोर आपापसात जोरदार भांडणे करून दहशत माजवून वाईट शिवीगाळ करून फिर्यादी व नागरिकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांच्या गाडीची पुढील बाजूची काच फोडून नुकसान केले. फिर्यादी (Chikhali) यांना शुभम कदमने जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता त्यांच्या तोंडावर मारून नाकावर उजव्या हातावर जबर दुखापत केली व सोडवायला येणाऱ्या नागरिकांना लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. ‘आम्ही इथले भाई आहोत. आमच्यामध्ये यायचे नाही. नाहीतर एका एकाला खल्लास करेल’ असे मोठ मोठ्याने ओरडून तमाशा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.