Beed : बीडमध्ये मराठा आंदोलन चिघळले; आंदोलकांनी नगरपरिषद आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ऑफिसला लावली आग

एमपीसी न्यूज : बीडमध्ये मराठा आंदोलन पेटले असून आंदोलकांनी चक्क नगरपरिषद जाळून टाकल्याची घटना (Beed )  समोर आली आहे. एवढेच नव्हे तर बीड आमदार संदीप क्षीरसागर यांचेही ऑफिस जाळले आहे. यामुळे बीडमध्ये आंदोलन चिघळले आहे. 

संतप्त आंदोलकांनी सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. त्यानंतर त्यांनी माजलगाव नगरपरिषदेकडे मोर्चा (Beed ) वळवला. आणि नगरपरिषदही जाळून टाकली. यामुळे नगरपरिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे राहते घर आंदोलकांनी जाळून टाकले आहे या बंगल्याला भीषण आग लागली आहे. नगर रोडवरील या बंगल्याला आग लागली असून बीड मधील परिस्थिती आता बाहेर गेली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.