Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलक धडकणार तहसील कार्यालयावर

एमपीसी न्यूज : मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation ) यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मोर्चामध्ये मोठ्या संख्यने लोकांनी सहभागी व्हावे असे, आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Talegaon Dabhade : कलापिनीत कोजागिरीच्या मनोरंजनाचे चांदणे उधळले

गुरुवारी सकाळी 11.00 वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.  शहरातील तहसील कार्यालय येथे विसर्जित करण्यात येणार (Maratha Reservation ) आहे.

दिघी येथे दुग्ध अभिषेक व  मशाल रॅली

दिघी येथे गुरुवार  दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता महादेव मंदिर, दिघी येथे दुग्ध अभिषेक करण्यात येणार आहे . त्यानंतर भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा  ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर , दिघी गावठाण येथून प्रारंभ  होऊन ही रॅली  मराठी शाळा – जकात नाका – विठ्ठल मंदिर –  साई पार्क मार्गे  धर्मवीर संभाजी महाराज चौक, दिघी येथे विसर्जित करण्यात येणार आहे.

मोरवाडी ते मासुळकर कॉलनी जनजागृती रॅली

मासुळकर कॉलनी येथे गुरुवार  दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  सायंकाळी 7.00 वाजता मोरवाडी गणपती मंदिर  येथून या रॅलीची सुरुवात होईल.   पुढे म्हाडा मार्गे मासुळकर कॉलनी येथे ही रॅली विसर्जित (Maratha Reservation ) करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.