Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी राखला शाहू महाराजांचा मान; दोन दिवस पाणी पिणार

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाला राज्यभरात (Maratha Reservation)  हिंसक वळण लागले आहे. यातच आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा महाराजांच्या शब्दाचा मान म्हणून दोन दिवस पानी पिण्याचे जरांगे पाटील यांनी मंजूर केले आहे.

सरकारला दिलेल्या वेळेत आरक्षण जाहीर न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण जाहीर केले. त्यांनी अन्न, पाणी आणि सलाईन न घेता हे उपोषण सुरू ठेवल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. यामुळे आज शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. एकाही मराठ्यानं आत्महत्या करू नये, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. शाहू महाराज सोबत तर कोणाचीही भीती नाही, असं मनोज जरांगेही म्हणाले आहेत. तर शाहू महाराजांचा मान राखत जरांगेंनी दोन दिवस पाणी पिणार असल्याचंही सांगितलं आहे.

या सोबतच त्यांनी जाळपोळ कोण करत आहे माहीत नाही. पण मराठ्यांवर कोणताही ठपका लागेल अशी वागणूक करू नका आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.