Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ( Maratha Reservation ) उद्या (मंगळवारी, दि. 20) राज्य शासनाने विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

किल्ले शिवनेरी येथे आयोजित शासकीय शिवजन्मोत्सव सोहळ्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता, इतर कोणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेश घेतले जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. तसेच राज्यभर या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपोषण आणि निदर्शने केली जात  ( Maratha Reservation ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.