Pune : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी  रोहिदास जाधव नामक तरुणाने (Pune) वाघोली  पोलीस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतले होते. त्याच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू होते .आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

रोहिदास राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तींशी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे वाद सुरू होते. अशात त्याच व्यक्तींकडून काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली होती. झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला. रोहिदासने संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला आणि हताश झाला.

यातच  लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकी समोर त्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये तो 90 टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची तडफडकी बदली केली होती.याच प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले (Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.