स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारा ‘तो येतोय’!

'वीर भाई कोतवाल' चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रदर्शित

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- खरंतर स्वातंत्र्यासाठी हजारो नागरिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्यातच अमूल्य योगदान होतं आझाद दस्त्याचं. वीर भाई कोतवाल यांच्या समर्थ नेतृत्वाखाली हा दस्ता कार्यरत होता, आपला चाललेला वकीली व्यवसाय सोडुन केवळ स्वत:च्या सुखांचा विचार न करता आपल्या मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी दिलेला हा असा एक रोमहर्षक लढा होता. येत्या 24 जानेवारी रोजी ‘वीर भाई कोतवाल’ चित्रपट रसिकांसाठी प्रदर्शित होत आहे.

स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे थोर पिता पुत्र म्हणजे च गोमाजी पाटील आणि त्यांचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला मुलगा हिराजी पाटील, यांचे ही योगदान लाख मोलाचे होते, सिध्दगड येथे इंग्रजांशी झालेल्या घनघोर युध्दात हिराजी देशासाठी शहिद झाला, वडील गोमाजी पाटील यांचा सुरुवातीचा विरोध गळुन पडला, आपल्या मुलाच्या जिगरी ला सलाम करत न डगमगता “असे दहा पुत्र जरी मला असते तरी ते या देशाला अर्पण केले असते” या निर्धाराने ते लढतच राहीले,

या प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केली आहे हुतात्मा हिराजी पाटील यांचे नातु प्रवीण पाटील यांनी तर याचे दिग्दर्शन केले आहे एकनाथ देसले यांनी, हा चित्रपट कर्जत, माथेरान, सिध्दगड येथे चित्रित झाला आहे. अशी ही नव्या येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी सोडता कामा नये. येत्या 24 तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. “तो येतोय”. वीर भाई कोतवाल…….. एक तर स्वातंत्र्य नाहीतर स्वर्ग !

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like