Maths Day : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये नाटिका, नृत्य प्रश्नमंजुषा अशा विविध गणितीय उपक्रमांद्वारे राष्ट्रीय गणित दिन (Maths Day) साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात (Maths Day) मुख्याध्यापक पर्यवेक्षक व विद्यालयातील गणित शिक्षक यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

विद्यालयातील गणित शिक्षिका संध्या शिंदे यांनी श्री श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व प्रसिद्ध हार्डी रामानुजन क्रमांक 1729 या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘गणिताचे आयुष्यातील महत्व’ या विषयावरील नाटिका व भूमितीय आकारांचे वैशिष्ट्य दाखवणाऱ्या गाण्यावर नृत्य सादर केले  तसेच गणित विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी वर्तुळाचे प्रमेय, समांतर रेषांचे प्रमेय संख्यारेषेवरील क्रिया, गुणोत्तर प्रमाण, भौमितिक आकार व त्यांचे वैशिष्ट्ये, वर्ग व वर्गमूळ काढण्याच्या क्लुप्त्या, घन व घनमूळ शोधण्याच्या क्लुप्त्या इत्यादी विषयावरील तक्ते, प्रतिकृती व शैक्षणिक साहित्य बनवले (Maths Day) यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील गणित शिक्षिका सुजाता गुंजाळ, संध्या शिंदे, प्रतिभा सिरसाट, प्रियंका मोहिते, शाहीन शेख इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Jaykumar Gore Accident : नदी पुलावरून 50 फूट खाली मोटार कोसळली, आमदार जयकुमार गोरे थोडक्यात बचावले

या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे व उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.