Maval Corona News : नवीन 88 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.27)88 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1290 आहे.

शहरी भागात 61रूग्ण तर ग्रामीण भागात 27रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 40 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 18 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 03 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 31,033 झाली आहे. तर दिवसभरात 121 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे, चांदखेड,वराळे व आढले बुद्रुक येथे प्रत्येकी 03 रूग्ण सापडले. शिरगाव व बेडसे येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले. येळसे, धानगव्हान, महागाव, शिंदगाव, कुसगाव, ओवळे, तिकोना, अजीवली, इंदोरी,तळेगाव दाभाडे (ग्रामीण) व ताजे, येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला.असे एकूण 27 रुग्ण सापडले.

29,218 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,509 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,003 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,523 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,055 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,978 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.15 टक्के आहे तर मृत्यू दर 1.69 टक्के आहे.सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 885 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 110 वडगाव नगरपंचायतमध्ये 49 व ग्रामीण भागात 246 असे एकूण 1290रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.